Type Here to Get Search Results !

100+ दिपावली शुभेच्छा | Diwali Wishes in Marathi | Best Diwali Quotes in Marathi

 
100+ दिवाळी शुभेच्छा | Diwali Wishes in Marathi | Best Diwali Quotes in Marathi

मराठीतूनच शुभेच्छा का पाठवाव्यात?

तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना मराठीतून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यास, त्यामुळे एक खास जिव्हाळ्याचं नातं तयार होतं. मराठी ही ज्यांना समजते अशा लोकांशी ही भाषा एक विशेष जोड निर्माण करते. मराठीतल्या शुभेच्छा मनापासून येणार्या आणि अंतरिक जोडणाऱ्या भावना असतात.मराठी ही एक अशी समृद्ध भाषा आहे, जी आपल्या भावना अतिशय सुंदरपणे मांडू शकते. मग ती शुभेच्छा कुटुंबासाठी असो, मित्रांसाठी असो वा सहकाऱ्यांसाठी असो, मराठीतील शुभेच्छांमुळे तिला एक वेगळीच आपुलकीची झळक येते.मराठी ही आपली मायभाषा आहे. त्यातील शुभेच्छा म्हणजे केवळ शब्द नसतात, तर त्या मनातील भावनांचा आदर आणि आपुलकीचा स्पर्श असतो.
 
    सण साधासुधा असावा,
    नको पैश्यांची उधळण..
    क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी,
    नको आयुष्यभराची चणचण..
    🙏🧨 दिवाळी शुभेच्छा 🧨🙏 

    नको फटाक्यांचा कचरा,
    नको कर्ण कर्कश आवाज..
    अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा,
    राखा शुद्ध पर्यावरण..
    🙏🧨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏
   
    करू दिवाळी साजरी यंदा,
    गोर गरिबांना मिठाई वाटून..
    हाच संदेश देतो तुम्हाला,
    दिवाळी शुभेच्छांमधून..
    दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!   
 
    सण दिवाळीचा,
    आनंददायी क्षणांचा..
    नात्यातील आपुलकीचा,
    उत्सव हा दिव्यांचा..
    🙏🧨दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏
   
    ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या
    कुटुंबासाठी उज्वल जावो.
    या दिवाळीत देव तुम्हाला
    प्रत्येक गोष्टीत यश देवो.
    💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫
   
    अंधारवाटा उजळून निघाल्या
    दीपावलीच्या या दिनी
    सदैव मंगल होवो सर्वांचे
    हीच कामना मनी
    🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
   
    श्री रामजी तुमच्या घरी सुखाचा
    वर्षाव करोत
    दु:ख नष्ट करो,
    प्रेम आणि दिव्यांच्या चमकने
    तुमचे घर उजळेल,
    प्रकाशाचे दिवे तुमच्या जीवनात
    आनंद घेऊन येवोत!
    ❤️दिवाळी शुभेच्छा संदेश!❤️
   
    आनंद होवो overflow
    मजा कधी होऊ नये Low,
    संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव होवो,
    असा तुमचा दिवाळी सण असो!
    🧨दिवाळी शुभेच्छा 2025🔥
   
    द्वारकेत श्रीकृष्ण ,
    अयोध्येमध्ये राम;
    _ च्या पायांशी
    माझे चारही धाम.

    भाग्याची जीवनज्योत
    प्रीततेलाने तेवते ;
    दिवाळीच्या दिवशी _ रावांना
    मी दीर्घायुष्य मागते..
    🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
 
    जीवनाचे रूप आपल्या
    तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
    खरोखरच अलौकिक असुन,
    ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
    आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
    जीवन लखलखीत करणारी असावी…
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!   

    धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
    कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
    संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
    प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
    आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
    💥शुभ दिवाळी!💥
   
    दारी दिव्यांची आरास,
    अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
    आनंद बहरलेला सर्वत्र,
    आणि हर्षलेले मन,
    आला आला दिवाळी सण,
    करा प्रेमाची उधळण..
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
   
    आज बलिप्रतिपदा!
    दिवाळी पाडवा,
    राहो सदा नात्यात गोडवा..
    कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
    बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
    साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
    बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
    परिवारास मनापासून शुभेच्छा..
    शुभ दीपावली!
   
    पहीला दिवा आज लागला दारी,
    सुखाची किरणे येई घरी,
    पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
   
    नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
    घेउन येवो ही दिवाळी,
    ध्येयार्पण प्रयत्नांना,
    दिव्य यशाची मिळो झळाळी,
    आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
    ही दिवाळी.
    🙏शुभ दिपावली..! 🙏
   
    दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
    साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
    मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
    परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
   
    घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
    माळोनी गंध मधुर उटण्याचा..
    करा संकल्प सुंदर जगण्याचा,
    गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
    दीपावली शुभेच्छा!
    💫दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !💫
  
    “सगळा आनंद सगळे सौख्य,
    सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
    यशाची सगळी शिखरे,
    सगळे ऐश्वर्य,
    हे आपल्याला मिळू दे,
    ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…”
   
    आनंदाचे दीप उजळू दे
    सदैव आपल्या घरी,
    तनामनावर बरसत राहो
    चैतन्याच्या सरी,
    सौख्य, संपदा, समृध्दीला
    नुरो कदापी उणे
    दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
    हेच एक मागणे..
   
    दिवे तेवत राहो,
    सर्वाचं घर प्रकाशमान होवो,
    सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस
    असेच झगमगत राहोत,
    ✨दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा✨
   
    दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
    साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
    मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
    परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
   
    “रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
    लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
    धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
    कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
    या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…”
   
    हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
    प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
    मनोकामना…!
    ✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!✨
   
    आनंद घेऊन येतेच ती,
    नेहमीसारखी आताही आली..
    तिच्या येण्याने मने,
    आनंदाने आनंदमय झाली..
    सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून,
    💥😊आनंदाची शुभ दिपावली..😊💥
    🧨🙏Happy Diwali 🙏🧨
   
    “यशाची रोषणाई
    कीर्तीचे अभ्यंग स्नान
    मनाचे लक्ष्मिपुजन
    समृद्धीचे फराळ
    प्रेमाची भाऊबीज
    अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा”

    जीवनाचे रूप आपल्या
    तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
    खरोखरच अलौकिक असुन,
    ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
    आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
    जीवन लखलखीत करणारी असावी…
    ✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨
   
    आनंदाचे गाणे गात दिवाळी
    येते अंगणात,
    सुखाची मग होते बरसात
    तेजाची मिळते साथ.
    हि दिवाळी आनंदाची,
    सुखसमृध्दीची जावो.
    🧨Happy Diwali 2025🧨  

    नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
    नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
    सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
    शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
    💥दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!💥
   
    “फटाक्यांची माळ,
    विजेची रोषणाई,
    पणत्यांची आरास,
    उटण्याची आंघोळ,
    रांगोळीची रंगत,
    फराळाची संगत,
    लक्ष्मीची आराधना,
    भाऊबीजेची ओढ,
    दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
    दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!”
   
    दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
    फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
    अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
    सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
    ✨हॅप्पी दिवाळी 2025✨
  
    “प्रकाशाच्या या सणानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. सुख आणि शांतता सदैव नांदो.”
   
    “Wishing you and your family a very happy Diwali. 
     May peace and happiness always be with you.”
   
    आली दिवाळी उजळला देव्हारा..
    अंधारात या पणत्यांचा पहारा..
    प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
    आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
    💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💫
   
    प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार,
    घराघरात साजरा होऊ दे आनंद,
    घराघरात होवो दिवाळी,
    प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी,
    प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि
    सुगंधित होवो प्रत्येक सकाळ,
    सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष
    विसरून मनात ठेऊ नये शंका आणि
    शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
    🙏शुभ दीपावली🙏
  
    अंधारवाटा उजळून निघाल्या
    दीपावलीच्या या दिनी
    सदैव मंगल होवो सर्वांचे
    हीच कामना मनी
    💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.💫
  
    “दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! तुमच्या घरात सदा सुख-समृद्धी नांदो.”
   
    गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
    सरस्वतीपूजा व दीपपूजा,
    दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
    वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
    ✨दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!
   
    रंगीबेरंगी रोषणाई
    फटाक्यांची आतिषबाजी
    फराळाचा घमघमाट
    पाहुण्यांची रेलचेल
    म्हणजेच दिवाळी नव्हे
    तर
    नात्यातील सैल
    झालेली वीण पुन्हा
    घट्ट करणे होय.
    🏮Happy Diwali 2025🏮
   
    हात पकडून पुन्हा खेळूया,
    आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया,
    विसरून जुने हेवे-दावे,
    चला मिळून दिवाळी साजरी करूया.
    🙏शुभ दिवाळी 2025🙏
   
    दिवाळी अशी खास,
    तिच्यात लक्ष्मीचा निवास…
    फराळाचा सुगंधी वास,
    दिव्यांची आरास…
    मनाचा वाढवी उल्हास,
    अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
    तुमच्यासाठी खास !!
    हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
    🙏*शुभ दिपावली*🙏
   
    “दिवाळीचे हे शुभ पर्व तुमच्यासाठी आनंद, समाधान आणि यश घेऊन येवो.”
   
    थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ
    द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
    विसरून जा या सणाअगोदर,
    नका विचार करू कोणी दिलं
    दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
    तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
    कधी न होवो निराशा…
    आम्हा सगळ्यांकडून
    💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💫
   
    चला आज पुन्हा एकदा दीप लावूया,
    रूसलेल्यांना मनवूया,
    डोळ्यातील उदासी दूर करून
    जखमांवर फुंकर घालूया.
    चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.
    💫हॅपी दिवाळी🔥
   
    धन त्रयोदशी !!
    नरक चतुर्दशी !!
    लक्ष्मी पूजन !!
    बलि प्रतिपदा !!
    भाऊबीज !!
    आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
    ✨शुभ दीपावली..!✨    

    “तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचे जीवन दीपांच्या तेजाने उजळलेले राहो.”

    यशाची रोशनी,
    समाधानाचा फराळ,
    मंगलमय रांगोळी,
    मधुर मिठाई,
    आकर्षक आकाशकंदील,
    आकाश उजळवणारे फटाके!!
    दिवाळीत,
    हे सगळं तुमच्यासाठी!!
    🙏दिवाळीनिमित्त सर्वांना
    लक्ष लक्ष शुभेच्छा!!🙏
   
    उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट..
    दिव्यांची आरास, फराळाचे ताट..
    फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट..
    नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
    💫शुभ दीपावली..!💫
   
    वसंत ऋतुच्या आगमनी
    कोकिळा गाई मंजुळ गाणी
    दिवाळीच्या आज शुभदिनी
    सुखसमृध्दी नांदो जीवनी!!!
    🏮Happy Diwali 2025🏮
   
    सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
    या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो..
    ✨दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा..!✨
   
    दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
    मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या
    दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
    सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती,
    💥सर्वांना हॅपी दिवाळी.💥
   
    “दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचे आयुष्य आनंदाने आणि समृद्धीने भरून जावो.”
   
    “Heartfelt Diwali wishes! May your life be filled with joy and prosperity.”
   
    सडा घालून अंगणी,
    रंग भरले रांगोळीत..
    झेंडूच्या फुलांचे तोरण,
    दिवा शोभतो दिवाळीत..
    🙏हि दिवाळी आपणास सुखकारक
    आणि समृद्धीची जावो..! 🙏
   
    जाहला आरंभ आनंद पर्वाला,
    दीपोत्सव – दिवाळी सुरु झाला..
    सप्तरंगात आसमंत उजळला,
    चैतन्य, उत्साह मनी उसळला..
    धन, आरोग्य, मन:शांति लाभो,
    याच शुभेच्छा आपणा सर्वांना..
    🙏🧨 शुभ दिवाळी 🧨🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.